Prakash Ambedkar | “भाजपला जसे उद्धव ठाकरे नको होते, तसंच त्यांना एकनाथ शिंदे देखील नको आहेत, फक्त…”, प्रकाश आंबेडकर

मुंबई : वंचित बहूजन आघाडीचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या एका वक्तव्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अंधेरी पोट निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरांना काही प्रश्न विचारण्यात आले होते. याचं उत्तर देताना त्यांनी अनेक खळबळजनक विधानं केली आहेत. ज्या प्रकारे भाजप पक्षाला उद्धव ठाकरे नको होते त्याप्रमाणं एकनाथ शिंदे नको आहेत, असा दावा आंबेडकरांनी केला आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी सांगितला पुढचा डव –

मतदार हा राजा आहे, त्या राजाला कोणाला बसवासं वाटतं तो त्याला बसवेल. तो निर्णय आनंदानं स्विकारावा असं म्हणत ज्याप्रमाणे भाजपला उद्धव ठाकरे नको होते, त्याचप्रकारे त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा नको आहेत, असं मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली. हे बॅगेज त्यांना बाहेर काढायचे आहे. त्यांना परिस्थिती अनुकूल दिसली तरच एकनाथ शिंदे यांना निवडणुकांमध्ये सोबत घेतील, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

वेट अँड वॉच भूमिकेत –

यादरम्यान, अंधेरी पोट निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार असं देखील प्रकाश आंबेडकरांना विचारण्यात आलं होतं. यावेळी आम्ही वेट अँड वॉच भूमिकेत आहोत. मला वाटतं ही निवडणूक शिवसेनेच्या दोन्ही गटांसाठी महत्त्वाची आहे. या निवडणुकीत भाजपाचा उमेदवार आहे. त्यामुळे त्यांना पाठिंबा देण्याचा प्रश्नच येत नाही. आमच्याकडे कोणीही पाठिंबा मागितला नाही. त्यामुळे आम्ही कोणतीही भूमिका घेतलेली नाही, असं प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, युती करताना कोणत्या पक्षासोबत युती कराल असा प्रश्न आंबेडकरांना विचारण्यात आला होता. यावर, आमच्या पक्षाच्या अध्यक्ष रेखा ठाकूर यांनी सांगितले होते की, काँग्रेस किंवा शिवसेना यांच्याबरोबर युती करु, या भूमिकेला कोणी प्रतिसाद दिला नसल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले. जो कोणी पहिला प्रस्ताव देईल, जो सोयीचा वाटेल त्यांच्यासोबत जाण्याची भूमिका घेऊ असे आंबेडकर यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.