Prakash Ambedkar | टीम महाराष्ट्र देशा: औरंगजेबाच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली होती. त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा उधाण आलं आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, “सध्या औरंगजेबाबाबत जे चुकीचे नॅरेटिव्ह चालले आहे. त्याचबरोबर हिंदू-मुस्लिम यांच्यातील वाद मला थांबवायचा होता. म्हणून मी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली आणि माझ्या या सर्व प्रयत्नांना यश आलं आहे. कारण ज्या दंगली होणार होत्या त्या थांबल्या आहेत.
I stopped Hindu-Muslim riots by visiting Aurangzeb’s tomb – Prakash Ambedkar
पुढे बोलताना ते म्हणाले, “अनेकजण औरंगजेबाच्या कबरीला भेट द्यायला गेले आहेत. त्यांच्या नावाची यादी मी तुम्हाला देतो. औरंगजेबाच्या कबरीला भेट देऊन मी हिंदू-मुस्लिम दंगल थांबवली आहे.”
दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया येतील? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
- Keshav Upadhye | शरद पवारांना ‘भावी’ प्रधानमंत्री होण्याची घाई झाली – केशव उपाध्ये
- Bhuvneshwar Kumar | BCCI चा मोठा निर्णय! भुवनेश्वर कुमारची कसोटीनंतर ODI कारकीर्द संपली?
- Chandrashekhar Bawankule | जनता तुमच्या ‘मेरा घर – मेरे बच्चे’ मोहिमेला साथ देणार नाही; बावनकुळेंचा शरद पवारांना इशारा
- Chitra Wagh | उद्धव ठाकरे, चोराच्या उलट्या बोंबा मारू नका – चित्रा वाघ
- Deepak Kesarkar | बेजबाबदार, बेलगाम किती बोलावे याचा उत्कृष्ट नमुना म्हणजे आदित्य ठाकरे – दीपक केसरकर
Original NEWS SOURCE – https://bit.ly/433BLo6