Prakash Ambedkar | शरद पवार-प्रकाश आंबेडकर यांच्यातील संबंध सुधारतील का?; स्वत: आंबेडकर म्हणाले…
Prakash Ambedkar | मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची युती झाली असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यावरु राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
ही युती फक्त शिवसेनेसोबतच आहे का? प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीत घेणार का? राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातील संबंध सुधारतील का? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जात आहेत. त्यावर स्वत: प्रकाश आंबेडकर यांनी उत्तर दिले आहे.
“शरद पवार यांनी रविवारी एका कार्यक्रमात बोलताना वंचितशी युती करण्याविषयी अप्रत्यक्षपणे नकार दर्शविला होता. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या युतीबाबत मला माहिती नाही. मी या भानगडीतच पडत नाही”, असे स्पष्ट मत शरद पवार यांनी व्यक्त केले होते.
“ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीत होत असलेल्या युतीविषयीची शरद पवार यांची प्रतिक्रिया मी वाचली. ही प्रतिक्रिया नवीन नाही. आमच्या दोघांचे भांडण फार जुने आहे. हे शेतातले भांडण नाही तर नेतृत्त्व आणि कोणत्या दिशेने जायचे, याचे भांडण आहे. त्यामुळे आगामी काळात शरद पवार आमच्यासोबत येतील, अशी अपेक्षा मी बाळगतो”, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.
दरम्यान, आता शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीवर शरद पवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडून काय प्रतिक्रिया येते? आणि वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीमध्ये घेण्यासाठी राष्ट्रवादीकडून होकार मिळतो का हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी सामिल झाली तर राज्यात चार पक्ष विरुद्ध शिंदे गट आणि भाजप अशी काटे की टक्कर पाहायला मिळेल.
महत्वाच्या बातम्या
- Uddhav Thackeray | “गद्दारांना आणि त्यांच्या राजकीय बापांना…”; उद्धव ठाकरेंचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल
- Uddhav Thackeray | “शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांचे संबंध…”; उद्धव ठाकरे स्पष्टच म्हणाले
- Narayan Rane | “साहेब, मला क्षमा करा!” बाळासाहेबांच्या जयंतीदिनी नारायण राणेंचं भावनिक पत्र
- Chandrashekhar Bawankule | “जो नेता आपलं घरं आणि ४० आमदार सांभाळू शकत नाही तो युती काय टिकवणार? “
- Prakash Ambedkar | युतीनंतर प्रकाश आंबेडकरांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “नातेवाईकांचं राजकारण…”
Comments are closed.