Prakash Ambedkar | शिवसेना आणि वंचित एकत्र येण्याच्या चर्चांवर अखेर शिक्कामोर्तब! प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टच सांगितलं

Prakash Ambedkar | मुंबई : शिवसेना (Shivsena) आणि वंचित एकत्र येण्याच्या चर्चांना मोठ्या प्रमाणात उधाण आलं होतं. यावर आता अखेर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. याबाबत वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि प्रकाश आंबेडकर यांच्या युतीनंतर राज्यातील राजकीय वातावरणाकडे पाहणं महत्वाचं राहिल.

यावेळी, आगामी निवडणुकीत शिवसेना आणि वंचित एकत्र भाजपविरोधात लढेल, असं आंबेडकरांनी स्पष्टच सांगितलं आहे. तसेच महाराष्ट्रात सध्या असणारं राज्य हे सुप्रीम कोर्टाच्या स्टे ऑर्डरवर सुरु आहे. सुप्रीम कोर्टाला विनंती आहे की, त्यांनी स्टे ऑर्डरच्या याचिकेबाबत ताबोडतोब निर्णय घ्यावा, असं देखील ते म्हणाले.

दरम्यान, शिवसेनेसोबत एकत्र कधी येणार हे निवडणूक कधी लागणार यावर अपेक्षित आहे, ताबोडतोब निवडणूक झाली तर लगेच एकत्र येऊ, नंतर निवडणूक लागली तर नंतर येऊ, असं देखील प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.