Prakash Ambedkar | “शिवसेना या जागांवर लढणार असेल, तर…”; पुण्याच्या पोटनिवडणुकीबाबत प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य

Prakash Ambedkar | नाशिक : कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असा भाजपचा प्रयत्न आहे. पण महाविकास आघाडीदेखील ही निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे. या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून उमेवार जाहीर करण्यात आले आहेत. तर लवकरच महाविकास आघाडीकडूनही उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे. या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीची नेमकी काय भूमिका आहे, याबाबत प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसेनेला आमचं समर्थन असेल

“आमची शिवसेनेची युती आहे. आम्ही शिवसेनेला विनंती केली होती की, त्यांनी या दोन्ही जागा लढवाव्या. कारण कसब्याच्या जागेवर काँग्रेसचा पराभव झाला आहे आणि राष्ट्रवादीने इथे उमेदवारच जाहीर केला नव्हता, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे शिवसेना काय भूमिका घेते त्यानंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू. मात्र, शिवसेना या जागांवर लढणार असेल, तर नक्कीच आमचं समर्थन असेल”, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

निवडणूक बिनविरोध व्हावी, ही प्रथा पडू नये” (Prakash Ambedkar statement regarding the Pune by-election)

कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजप आणि शिंदे गटाचा प्रयत्न आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षांशी संपर्कदेखील केला आहे. याबाबत विचारलं असता, “लोकशाहीत बिनविरोधी ही संकल्पनाच नाही. तसेच एखाद्या आमदाराचे निधन झाले, तर त्यांच्याबद्दल सहानुभूती असेल, याबाबत दुमत नाही. मात्र, येथील निवडणूक बिनविरोध व्हावी, ही प्रथा पडू नये. ही संकल्पना लोकशाहीत बसत नाही. त्यामुळे लोकांना नवीन लोकप्रतिनिधी निवडू द्यावे, या मताचा मी आहे”, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

You might also like

Comments are closed.