Prakash Ambedkar | “सरकारला आम्ही मागेही इशारा दिला होता आज पुन्हा देतोय…”; मणिपूर प्रकरणावर प्रकाश आंबेडकरांची संतप्त प्रतिक्रिया

Prakash Ambedkar | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या दोन महिन्यांपासून मणिपूरमध्ये जातीय दंगली होत आहे. या राज्याची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे.

अशात कालपासून मणिपूरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे. याच पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

मणिपूरमध्ये दोन महिलांची एका जमावाने नग्न धिंड काढून त्यांचा सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या प्रकरणावर प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.

The incidents happening in Manipur are not new – Prakash Ambedkar

ट्विट करत प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले, “मनीपुरमध्ये घडणाऱ्या घटना नवीन नाहीत. या अगोदर ही अशा घटना घडलेल्या आहेत.

त्याविरोधात मनीपुरच्या महिलांनी सैन्याच्या ऑफिसवर नग्न मोर्चा काढला होता. शासन भाजपचे असो वा इतर कोणाचे, उत्तर पूर्वेच्या राज्यांची विशेष परिस्थिती लक्षात न घेता स्वतःचा मनमानी कारभार राबवल्यामुळे हा उद्रेक होतो आहे.”

“सरकारला आम्ही मागेही इशारा दिला होता आज पुन्हा देतोय, उत्तर पूर्वेला तिबेट आणि अरुणाचल प्रदेशला लागून असलेल्या सीमांवर चीन वसाहती तयार करतोय. हा धोका आहे.

जी लोकं जशी आहेत तशी स्वीकारायला आपण शिकलं पाहिजे. आपली संस्कृती इतरांवर लादणं बंद झालं तर संपूर्ण उत्तर पूर्व, सेव्हन सिस्टर्स अँड वन ब्रदर, येथे शांतता नांदेल आणि ते भारताबरोबर रहातील अशी परिस्थीती आहे.

मनीपुर येथे घडलेल्या अमानवीय घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो व सर्व गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा करावी ही मागणी करतो”, असही ते (Prakash Ambedkar) या ट्विटमध्ये म्हणाले आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/46Yv89F