Prakash Ambedkar । सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर प्रकाश आंबेडकरांची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले…

Prakash Ambedkar । मुंबई : सर्वोच न्यायालयाने आज आर्थिक आरक्षणाबाबत (EWS Reservation) ऐतिहासिक निर्णय दिला आहे. केंद्र सरकारने लागू केलेलं आर्थिक १० टक्के आरक्षण वैध असून घटनाविरोधी नसल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे देशात आर्थिक घटकावर आरक्षण देता येणार आहे. मावळते सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या घटनापीठाने हा निकाल दिला आहे. या निर्णयानंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी यावर संताप व्यक्त करत ‘भ्रष्ट निकाल’ असल्याचं म्हंटल आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी प्रतिक्रिया दिलीय.

प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले, “या निर्णयामुळे मागच्या दारातून मनुस्मृती आली आहे. तुम्ही आर्थिक आधारावर आरक्षण दिलं आहे. मात्र, आर्थिक आधारावर आरक्षण देताना, त्याची जात हा आधार नाही, तर आर्थिक स्थिती पाहिली जाणार जाणार आहे. पण, ओबीसी, एस सी, एस टी यांना यातून वगळणे हा निर्णय म्हणजे कलम १४ च्या विरोधातील आहे,” असं मत प्रकाश आंबेडकर यांनी मांडलं आहे.

पुढे ते म्हणाले, “दोन गोष्टी गहाळ झाल्या आहेत, त्याचं उत्तर कुठेचं सापडलं नाही. संविधानाने कलम १६ मध्ये मागासवर्गीय हा शब्द वापरला आहे. संसदेत एकदा जात शब्द का वापरला नाही, यावर स्पष्टीकरण देताना बाबासाहेबांनी सांगितलं, जातीच्या आधारावर हा देश विभागायला नको आहे. तसेच, कलम ३४१ मध्ये अनुसूचित जाती म्हटलं आहे. अनुसूचित जात म्हटलं नाही,” असेही प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यावेळी म्हणाले.

EWS म्हणजे काय?

EWS म्हणजे Economically Weaker Sections अर्थात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक. EWS वर्गातील व्यक्तींना शिक्षण आणि नोकरीत दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं गेल्या वर्षी घेतला होता, ज्यावरून तेव्हाही बरीच चर्चा झाली होती. ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे अशा व्यक्तींना EWS अंतर्गत शिक्षण आणि नोकरीत आरक्षण मिळू शकतं. EWS आरक्षणासाठी पात्र व्यक्तींच्या कुटुंबाची शेती पाच एकरापेक्षा जास्त नसावी असं हा कायदा सांगतो.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.