Prakash Ambedkar | “शरद पवार आजही भाजपसोबत”; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा

Prakash Ambedkar |  मुंबई :  शिवसेनेचे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीने युतीची घोषणा केली. त्यावरुन अनेकांनी या युतीवर टीका केली. त्याचबरोबर प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीमध्ये जाणार का याबाबत शंका होती.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याकडून प्रकाश आंबेडकर यांच्यासोबतच्या युतीवरुन आनंद व्यक्त केला जात आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या एकत्र येण्याने महाविकास आघाडीची ताकद आणखी वाढल्याचा दावा केला जात आहे. पण दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांनी ‘आपल्याला महाविकास आघाडीत जायचंच नाही’, असे खळबळ जनक वक्तव्य केले आहे.

शरद पवार आजही भाजपसोबतच

“लोकशाही आणि स्वातंत्र्यांची गळचेपी करीत देशाची हुकूमशाहीकडे वाटचाल होत आहे. हे रोखण्यासाठी राज्यात शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येत असल्याची घोषणा उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी  २३ जानेवारीला केली. मात्र, अद्यापही राष्ट्रवादी आणि काँग्रेसने वंचित आघाडीबरोबर जाण्याबद्दल आपली भूमिका जाहीर केली नाही. प्रकाश आंबेडकरांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ‘शरद पवार आजही भाजपाबरोबर आहेत’ प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे.

शरद पवार हे आजही भाजपबरोबर आहेत. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा सकाळचा शपथविधी झाला होता. त्यानंतर तीन-चार दिवसाने एका वृत्तपत्रात अजित पवारांनी मुलाखत छापून आली होती. त्यात अजित पवारांनी सांगितलं की, लोक मला का दोष देत आहेत, समजत नाही. हे आमच्या पक्षांचं ठरलं होतं. मी फक्त पहिला गेलो. 2019च्या लोकसभेपूर्वीच हे ठरलं होतं,” असे सांगत प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांना निशाण्यावर धरले आहे.

शरद पवार यांनी भाजपविरुद्ध सर्व विरोध पक्षांना एक करण्याचा प्रयत्न केला. यावर ते म्हणाले की, चंद्रशेखर (तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव ) यांनी ही प्रयोग केला, त्याच्या शरद पवार नव्हते. आताच्या असलेल्या प्रयोगात शिवसेनेला भाजपला सोडून बाहेर पडायचं होत. मी त्यावेळीही म्हणालो आजही म्हणतो, सेनेने काही तरी करून ती सत्ता आपल्या हातात ठेवून जर ते चाले असते, तर सरकार पडलं नसतं. ते म्हणाले, सत्तेची गरज ही काँग्रेस-राष्ट्रवादीला होती, शिवसेनेला नाही, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या