InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

सोलापूर आणि अकोला या दोन्ही जागा जिंकल्यावर कोणती जागा सोडणार ?, प्रकाश आंबेडकर म्हणतात…

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सोलापूर आणि अकोला अशा दोन जागेवरून निवडणूक लढवली आहे. या दोन्ही जागेवर जिंकल्यास कुठली जागा सोडणार असा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांना विचारला असता, प्रकाश आंबेडकर यांनी स्मितहास्य करत उत्तर देणे टाळले.

याबाबत आपण आताच काही बोलणार नाही, असे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी उत्तर देणे टाळले.

तसेच, पंतप्रधानपदासाठी कोण दावेदार असेल, याबाबत बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी एच डी दैवेगोडा यांचे नाव घेतले. शरद पवारांना मी पंतप्रधानपदासाठी लायक समजत नाही, असे ही आंबेडकर म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply