सोलापूर मतदार संघातून प्रकाश आंबेडकर निवडणूक लढवणार, सुशीलकुमार शिंदे यांची डोकेदुखी वाढणार

आगामी  सोलापूर लोकसभा मतदार संघातून बहुजन वंचित आघाडीकडून प्रकाश आंबेडकर निवडणूक लढविणार आहेत. याबाबत त्यांनी सोमवारी अकोला येथे पत्रकार परिषद घेवून सोलापूरमधून उभे राहण्याचे जाहीर केले. गेल्या वर्षभरात सोलापूर जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीची ताकद वाढली आहे.

त्यामुळे कार्यकर्त्यांकडून आंबेडकर यांना सोलापूर लोकसभा निवडणूक लढविण्याचा आग्रह होत होता. आंबेडकर हे सोलापूर लोकसभा मतदार संघातून लढणार असल्याने माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची डोकेदुखी वाढणार असल्याचे मानले जात आहे. 

महत्त्वाच्या बातम्या –

Loading...
महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.