InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

सारखा मटका लागत नाही, जावेडकरांचा काकडेंना टोला

एकदा मटका लागला म्हणजे सारखा लागत नाही, अशा शब्दांत केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सहयोगी खासदार संजय काकडे यांच्या दानवेंवरील व्यक्तव्याचा समाचार घेतला. संजय काकडे यांनी लोकसभा निवडणुकीबाबत केलेल्या भाकीतांवर मी विश्वास ठेवत नाही, अशी प्रतिक्रिया प्रकाश जावडेकर यांनी दिली.

महाराष्ट्रात युती झाली नाही तर लोकसभा निवडणुकीत भाजपला फटका बसेल. एवढच नाही तर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेदेखील पराभूत होतील, असं मत भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी व्यक्त केलं होतं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात मजबूत सरकारनं गरिबांसाठी अनेक योजना दिल्या आहेत. त्यामुळे मतदार मजबूत सरकारलाच पुन्हा कौल देईल, असा विश्वास जावडेकर यांनी व्यक्त केला आहे. ‘मेरा घर भाजपका घर’ ही मोहीम लवकरच हाती घेणार असल्याचं प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं. या मोहिमेअंतर्गत जे घर भाजपला मतदान करणार आहे,  त्या घरावर भाजपचा झेंडा लावला जाणार आहे, असं प्रकाश जावडेकर म्हणाले. देशाला मजबूत सरकार पाहिजे का मजबूर सरकार पाहिजे, हाच या निवडणुकीतील मुद्दा असेल. याच मुद्द्यावर लोकसभा निवडणूक लढवली जाईल.

महत्वाच्या बातम्या –

 

 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.