InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

राज्यातील राजकीय घडामोडी विषयी नो कमेंट्स- प्रकाश जावडेकर

नांदेड : महाराष्ट्रातील सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर मी काही भाष्य करणार नाही, नो कमेंट्स असे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी प्रसारमाध्यमांना बोलण्याचे टाळले. शिवसेनेकडे असलेले अवजड उद्योग खाते श्री. जावडेकर यांच्याकडे देण्यात आले असून त्याविषयी विचारल्यावरही त्यांनी अधिक बोलण्याचे टाळले.

श्री गुरुनानक देवजी यांची ५५० वी जयंतीनिमित्त मंगळवारी नांदेडला मल्टीपर्पज शाळेच्या मैदानावर माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या वतीने आयोजित बहुमाध्यम प्रदर्शनीचे उद्‍घाटन श्री. जावडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला.

Loading...

शिवसेनेकडील अवजड उद्योग हे खाते श्री. जावडेकर यांच्याकडे देण्यात आले असून त्याबद्दल विचारल्यावरही त्यांनी अधिक बोलण्याचे टाळले. मी नांदेडला धार्मिक कार्यक्रमासाठी आलो असून मी राजकीय घडामोडीवर इथे काही बोलणार नसल्याचे त्यांनी पुन्हा सांगितले.

प्रदर्शनीच्या उद्‍घाटनानंतर श्री. जावडेकर यांनी जगाला एक ओंकारचा संदेश देणारे श्री गुरुनानक देवजी हे महान व्यक्ती होते. आपण सर्वप्रथम मानव आहोत, आपल्या सर्वांचा पालनकर्ता एकच असून आपआपसातील मतभेद दूर करुन प्रेमाने, शांततेने रहावे, असा संदेश त्यांनी दिला असल्याचे सांगून त्यांनी जगाला दिलेला संदेश आज ५५० वर्षी प्रकाशपर्व म्हणून आपण सर्वजण साजरे करत आहोत.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्तारपूर कॅरीडॉरचे महत्व ओळखून त्याची तत्काळ अंमलबजावणी केली व एक चांगले काम झाले. नांदेडच्या सचखंड गुरुद्वारा संदर्भातही लवकरच एक फिल्म बनविण्यात येणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली.

Loading...
You might also like
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.