InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

‘या’ कारणाने प्रकाश राज यांनी केली निवडणूक आयोगाकडे तक्रार

प्रकाशराज कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार अशा बातम्या देण्यात आल्या होत्या. याविरोधात प्रकाशराज यांनी बंगळुरूतील कॉंग्रेसचे उमेदवार रिझवान अर्शद यांचे जवळचे समजले जाणारे मपजहर यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.

केंद्र सरकारविरोधात वक्‍तव्य करून राजकीय कारकीर्द सुरू करण्याचे संकेत देणारे दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज यांनी निवडणूक आयोगाकडे कॉंग्रेसविरोधात तक्रार दाखल केली आहे. बंगळुरूतून अपक्ष निवडणूक लढवणारे प्रकाशराज यांनी फेक न्यूजप्रकरणी कॉंग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.

प्रकाशराज यांनी यासंदर्भात एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यात प्रकाशराज यांनी म्हटले की, कार्यकर्त्यांसोबत वाद सुरू असताना कॉंग्रेसचे उमेदवार रिझवान यांच्याशी मी हात मिळवला. यानंतर हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्याची फेक न्यूज पसरवण्यात आली. हा फोटो व्हॉट्‌सऍपवर शेअऱ करून प्रकाश राज यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे खोटे पसरवले गेले.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply