Praniti Shinde | ” मोदी सत्तेत आल्यापासून महिलांच्या विरोधात…”; मणिपूर प्रकरणावरून प्रणिती शिंदेंचा सरकारवर हल्लाबोल

Praniti Shinde | मुंबई: मणिपूरची अवस्था दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था उध्वस्त होताना दिसत आहे.

अशात मणिपूरचा एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओनंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे. याच पार्श्वभूमीवर प्रणिती शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

प्रसार माध्यमांशी बोलत असताना प्रणिती शिंदे (Praniti Shinde) म्हणाल्या, “मणिपूरमध्ये ज्या पद्धतीने त्या महिलांवर अत्याचार झाला ते बघून अंगावर शहारे आले आहे. अशा घटना आपल्या देशात घडत असतील तर एक भारतीय म्हणून ही आपल्यासाठी अत्यंत लाजिरवाणी बाब आहे.

जेव्हापासून मोदी (Narendra Modi) सरकार सत्तेत आले आहे तेव्हापासून महिलांच्या विरोधातील विचारसरणी वाढत चालली आहे. हा विषय फक्त मणिपूर पुरताच मर्यादित नाही. तर हा आपल्या देशाच्या प्रतिमेचा आणि प्रतिष्ठेचा विषय आहे.”

Prime Minister Modi is not ready to comment on this issue in Parliament – Praniti Shinde

पुढे बोलताना त्या (Praniti Shinde) म्हणाल्या, “पंतप्रधान मोदी संसदेत या विषयावर भाष्य करायला तयार नाही. आम्ही विधानसभेत या प्रश्नावर बोलायला थोडा वेळ मागविला तर त्यांनी आम्हाला बोलू दिले नाही.

एक अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. महिलांच्या विरोधातील विचारसरणीमुळे आपला देश दिवसेंदिवस मागे चालला आहे.”

दरम्यान, मणिपूर येथील थौबाल या जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली (Praniti Shinde) आहे. 04 2023 रोजी ही घटना घडली असल्याची माहिती मिळाली आहे.या प्रकरणानंतर पोलिसांकडून अज्ञातांविरोधात अपहरण, हत्या आणि सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/46XAIcw