प्रार्थना बेहरेने ‘आपली यारी’ गाणं लॉंच करत दिला कॉलेजच्या मैत्रीला उजाळा

मुंबई : अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने गुरूवारी आपली यारी हे गाणे सोशल मीडियाव्दारे लाँच केले. बॉलीव़ूड निर्माता निखील नमीत आणि प्रार्थना बेहेरे गेले दहा वर्षापासून जवळचे मित्र आहेत. आपल्या मैत्रीच्या दशकपूर्ती निमीत्ताने प्रार्थनाने निखील नमीतच्या नादखुळा म्युझिक लेबलचे ‘आपली यारी’ हे गाणे नुकतेच सोशल मीडियाव्दारे रिलीज केले आहे.

गाण्याबद्दल बोलताना अभिनेत्री प्रार्थना बेहेरे म्हणाली, “नादखुळा ह्या निखीलच्या म्युझिक लेबलवर फ्रेंडशीप डे निमीत्ताने आपली यारी हे गाणे लाँच होतंय. आणि ते मला लाँच करायची संधी मिळाली, ह्याचा मला आनंद आहे. निखीलची आणि माझी मैत्री खूप जूनी आहे. त्यामूळे आमच्या दोस्तीच्या दशकपूर्तीला फ्रेंडशीपवरचेच गाणे मी लाँच करावे, हा दुग्धशर्करा योग आहे.”

तसेच निर्माता निखील नमीत म्हणतात, ”आपली यारी गाण्याप्रमाणेच प्रार्थनाची आणि माझी मैत्री पक्की आणि ‘जगात लय भारी’ अशी आहे. त्यामुळेच तिने हे गाणे लाँच करणे माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. महाराष्ट्रातल्या सध्याच्या पूरपरिस्थितीमूळे आम्ही ह्या गाण्याचा रिलीजचा सोहळा रद्द करून ते पैसे पूरग्रस्तांच्या मदतनिधीसाठी देतोय.”

नादखुळा म्युझिक लेबलच्या आपली यारी गाण्याने विक्रम केला आहे. फ्रेंडशीपडेच्या मुहूर्तावर आलेल्या ह्या गाण्यामध्ये पहिल्यांदाच दहा मराठी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर दिसत आहेत. गाण्याला निव्वळ 12 तासांमध्येच 1 मिलीयन व्ह्युज मिळाले.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा