Prasad Lad | “दाऊतच्या मांडीवर बसलेल्या शरद पवारांसोबत युती करणाऱ्यांनी…”, प्रसाद लाड यांचा किशोरी पेडणेकरांवर हल्लाबोल
Prasad Lad | मुंबई : देशभरात दिवाळी साजरी होत असली तरी नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप काही थांबेणात. अशातच भाजप (BJP) नेते प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी (NCP) पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.
किशोरी ताईंना मी हे सांगू इच्छितो की, आपल्याला विनंती आहे, ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचं हिंदुत्व सोडलं आणि दाऊतच्या मांडीवर बसलेल्या शरद पवार यांच्याबरोबर युती केली. काँग्रेसच्या पायावर डोक टेकवलं त्या पक्षाच्या नेत्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, असा घणाघात प्रसाद लाड यांनी केला आहे.
दरम्यान, प्रसाद लाड यांच्या टीकेला ठाकरे गट आणि किशोरी पेडणेकर या काय प्रत्युत्तर देणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशातच शरद पवार दाऊत सोबत असल्याच्या आरोपावरुन राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
दरम्यान, काही ठिकाणी झगमगती दिवाळी पहाट आहे. पैशांचा पाऊस पडतोय. वेगवेगळ्या माध्यमांतून हे सुरु आहे. पण विचार काय तर काहीच नाही, अशी टीका किशोरी पेडणेकर यांनी भाजपवर केली होती. तसेच बऱ्याचदा दोन पक्षांच्या कार्यक्रमांची तुलना केली जाते. पण जांभोरी मैदानावरची लोकं कंटाळली आहेत. प्रत्येक ठिकाणी शक्ती प्रदर्शन करण्याची गरज नाही असं म्हणत हा केविलवाणा प्रयत्न आहे, असं म्हणायला हरकत नाही. शिंदे गटातील वाचाळवीरांना दिवाळीच्या शुभेच्छा, अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकरांनी दिली होती.
महत्वाच्या बातम्या :
- Eknath Shinde | जुनी मैत्री की राजकीय खेळी?, शिंदे गटाकडून ठाकरे गटाला दिवाळीच्या शुभेच्छा
- Aditya Thackeray | “खोके सरकार नंतर आता घोषणा सरकार”, आदित्य ठाकरे कडाडले
- Vishwajeet Kadam | “महाराष्ट्राला लागलेलं ग्रहण घालवण्याची गरज आहे”, विश्वजीत कदमांचा भाजपला टोला
- Shinde-Fadanvis Govt | वर्षावर खलबतं! देवेंद्र फडणवीस रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
- Bhaskar Jadhav | “सरकारने दिलेली दिवाळी भेट केवळ गरीब शेतकऱ्यांची केलेली चेष्टा”, भास्कर जाधव संतापले
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.