‘प्रसाद लाड यांचे चंद्रकांत दादांनीच ओढले कान’, म्हणाले… ही महाराष्ट्राची संस्कृती नाही

मुंबई : भाजप आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवन फोडण्याची भाषा केली. त्यानंतर शिवसेना त्यांच्यावर तुटून पडली आहे. कार्यकर्ते-नेते-पदाधिकाऱ्यांनी उत्तरं देऊन झाल्यावर खुद्द मुख्यमंत्र्यांनीही थपडीची भाषा केली होती. यानंतर आज सामनाच्या अग्रलेखातून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आरपार लढाईची भाषा केली आहे.

यानंतर यावर भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आमदार प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावर माध्यमांनी प्रश्न विचरला त्यावर ते म्हणाले. ‘प्रसाद लाड यांनी दिलगिरी व्यक्त केली असून आता तो विषय संपला आहे’ महाराष्ट्रची ही संस्कृती नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. यावर लाड यांना चंद्रकांत पाटलांचा घरचा आहेर दिला का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे.

दरम्यान, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “तोडफोड करणं आमची संस्कृती नाही, आम्ही तोडफोड करत नाही”, असं फडणवीस म्हणाले आहेत. तसेच आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही, पण कोणी अंगावर आलं तर सोडत नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा