Pratap Sarnaik | “मुख्यमंत्र्यांनी मला ९०० खोके दिलेत, पण…”, प्रताप सरनाईक यांचं खळबळजनक विधान

Pratap Sarnaik | मुंबई : एकनाथ शिंदे यांनी भाजप पक्षासोबत युती केली. शिंदेंच्या या बंडात ४० आमदार सहभागी होते. त्यामुळे या आमदारांनी ५० खोके घेतल्याचा आरोप विरोधकांनी वारंवार केला आहे. अशातच बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी याची कबुली देत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली आहे.

यापुर्वी आम्हाला निधी मागावा लागायचा पण, आता समोरूनच निधी मिळत असल्याचा दावा सरनाईक यांनी केला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व सक्षम असून त्यांनी ठाणे महापालिका क्षेत्रातील विकासकामांसाठी १८०० कोटी रुपयांचा निधी देऊ केला आहे. त्यापैकी ९०० कोटीचा निधी हा ओवळा-माजिवाडा मतदार संघातील विकास कामांसाठी आहे तर, उर्वरित ९०० कोटींचा निधी मतदार संघ वगळून महापालिका क्षेत्रातील उर्वरित भागांसाठी आहे. या निधीमुळे रस्ते, सुशोभिकरण तसेच इतर नागरी कामे होणार आहेत, असं देखील प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे.

यादरम्यान, गुवाहाटीला असताना आम्ही कामाख्या देवीचे दर्शन घेतले होते. मनातल्या इच्छा, आकांशा पुर्ण झाल्यानंतर पुन्हा दर्शनाला येऊ असे साकडे देवीला घातले होते. इच्छा, आकांशा पुर्ण झाल्याने आम्ही देवीच्या दर्शनाला जाणार आहोत. २६ तारीख निश्चित झाली आहे. २७ तारखेला अनेक लग्न असल्यामुळे २६ तारखेलाच जाण्यासाठी सर्व आमदार आग्रही आहेत. मंत्रीमंडळ विस्तार होईल आणि त्यात कुणाला मंत्री आणि पालकमंत्री पद मिळेल, याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील, असं देखील ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.