Pravaig Defy SUV | ‘या’ महिन्यात लाँच होणार मेड इन इंडिया ‘Pravaig Defy SUV’

Pravaig Defy SUV | टीम महाराष्ट्र देशा: भारतामध्ये दिवसेंदिवस इलेक्ट्रिक वाहन (Electric Vehicle) चा ट्रेंड वाढत चालला आहे. याच परिस्थितीचा फायदा घेत Galuru आधारित स्टार्टअप कंपनी Pravaig Dynamics भारतीय बाजार मध्ये आपली पहिली इलेक्ट्रिक SUV लाँच करण्याच्या तयारीत आहे. ‘Pravaig Defy SUV’ या नावाने कंपनी पहिली इलेक्ट्रिक SUV लाँच करणार आहे. Pravaig ची ही येणारी Defy SUV एक मोठी SUV असून लक्झरी वाहनांमध्ये तिचा समावेश होईल. ही SUV अनेक नावीन्यपूर्ण वैशिष्ट्यसह सुसज्ज असून कमीत कमी किमतीमध्ये ऑफर करण्याचे उद्दिष्ट कंपनीचे आहे.

Pravaig Defy SUV वैशिष्ट्ये

Pravaig Defy इलेक्ट्रिक SUV मोठा बॅटरीपॅक, ऑल व्हील ड्राईव्ह आणि ड्युअल मोटर लेआउटसह सुसज्ज आहे. त्याचबरोबर यामध्ये मोठी टचस्क्रीन, डिजिटल डिस्प्ले आणि डिव्हिएट साउंड सिस्टीम इत्यादी गोष्टींचा देखील समावेश आहे.

पॉवरट्रेन

Pravaig Defy SUV च्या रेंज बद्दल जर बोलायचे झाले तर ही SUV रियल टाईम मध्ये 500 किमी पेक्षा जास्त देऊ शकते. त्याचबरोबर ही SUV 400bhp पॉवर जनरेट करून, 200kmph एवढा टॉप स्पीड देऊ शकते. या इलेक्ट्रिक SUV मध्ये 400V आर्किटेक्चर आहे जे V2L आणि इतर वैशिष्ट्यांना सपोर्ट करते.

बॅटरी

Pravaig Defy SUV इलेक्ट्रिक SUV च्या बॅटरी बॅकअप बद्दल सांगायचे झाले, तर ही फास्ट चार्जर टेक्नॉलॉजी सह फक्त 30 मिनिटांमध्ये रिचार्ज होते.

Pravaig Defy SUV कधी होणार लाँच

Pravaig कंपनी आपल्या वेगवेगळ्या गाड्यांवर आणि आपल्या सर्विसवर प्रायव्हेटलि काम करत असते. दरम्यान, कंपनी आपली Pravaig Defy SUV 25 नोव्हेंबर 2022 रोजी लाँच करण्याच्या तयारीत आहे. त्याचबरोबर लॉन्चिंगच्याच वेळी कंपनी या गाडीच्या अधिक स्पेसिफिकेशन बद्दल खुलासा करणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.