“बंगालमध्ये वाघीण जिंकली म्हणणारे, हिंसाचाराच्या घटनेवर मुग गिळून गप्प,” प्रवीण दरेकरांची शिवसेनेवर टिका

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या निकालानंतर मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू झाला आहे. या हिंसाचारात भाजप, तुरुमुल काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आपला जीव गमावला आहे. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. “बंगालमध्ये वाघीण जिंकली म्हणणारे हिंसाचाराच्या घटनेवर मुग गिळून गप्प आहेत,” अशा शब्दात दरेकरांनी शिवसेनेवर टीका केलीय.

“विचारांची लढाई विचारांनी लढली जावी, तिथे हिंसाचारास थारा नसावा! निवडणुकीनंतर बंगालमध्ये सुरू असलेला हिंसाचार अतिशय निंदनीय असून, हे थांबले पाहिजे! बंगालमध्ये वाघीण जिंकली म्हणणारे, हिंसाचाराच्या घटनेवर मुग गिळून गप्प आहेत! अशा घटनांचे समर्थन होऊ शकते का?”असा सवाल दरेकर यांनी केलाय.

त्याचबरोबर “बंगालमध्ये भाजपकडे गमावण्यासारखं काहीही नव्हतं! आज जेवढे आमदार निवडून आले आहेत, त्यामागे स्थानिक कार्यकर्त्यांचे समर्पन आहे. बंगालमध्ये वाढलेल्या जागा व मतांची वाढलेली टक्केवारी ही कार्यकर्त्यांना समर्पित आहे. परंतु ही हिंसा थांबली पाहिजे! जय श्रीराम!” असं ट्विटही दरेकर यांनी केलंय.

“ममता बॅनर्जी या बंगाली जनतेच्या स्वाभिमानाचा लढा एकाकी लढत होत्या. त्यांच्या हिमतीला दाद द्यावीच लागेल. अखेर त्यांचा विजय झालाच आहे. या विजयाचे संपूर्ण श्रेय बंगालच्या या वाघिणीलाच द्यावे लागेल. पंतप्रधानांपासून गृहमंत्र्यांपर्यंत संपूर्ण केंद्र सरकार, राज्यांची सरकारे ममता दीदींच्या पराभवासाठी पश्चिम बंगालच्या भूमीवर एकवटली. त्या सर्व शक्तींची धूळदाण उडवत ममता दीदींनी विजय मिळवला. मी त्यांचे व हिंमतबाज पश्चिम बंगाली जनेतेचे मनापासून अभिनंदन करतो. आता राजकारण संपले असेल तर सगळ्यांनी मिळून कोरोनाविरुद्धच्या लढाईकडे लक्ष देऊया”, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली होती.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.