प्रविण दरेकरांच्या अडचणी वाढल्या?, गुन्हा दाखल होण्याची शक्यता

मुंबई : लावणी सम्राज्ञी तसेच आपल्या लावलीने रसिकांना साद घालणाऱ्या सुरेखा पुणेकर यांनी १६ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे. सुरेखा पुणेकर यांच्या पक्षप्रवेशावरुन विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी टोला लगावला आहे. “राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे,” असा टोला प्रवीण दरेकरांनी यावेळी लगावला. “या पक्षाला गरीबांकडे पहाण्यासाठी वेळ नाही. सुभेदार, कारखानदार, बँका आणि उद्योगपतींचा पक्ष आहे,” अशी टीकाही यावेळी दरेकरांनी केली होती.

याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी चित्रपट विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी दरेकरांवर गुन्हा दाखल करणार असल्याचं म्हटलं आहे. प्रविण दरेकरांवर कायदेशीर आणि फौजदारी कारवाईसाठी राष्ट्रवादी चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाने चाचपणी सुरू केली आहे. याबाबत प्रवीण दरेकरांविरोधात पोलीस तक्रार करणार असल्याचं बाबासाहेब पाटील यांनी सांगितलं.

प्रविण दरेकर यांनी गौरी-गणपतीच्या उत्सवादरम्यान केलेलं वक्तव्य हे कलाक्षेत्रातील महिलांचा आणि मातृशक्तीचा अपमान करणार आहे. या वक्तव्यातून भाजपची मनोवादी आणि विकृत मानसिकता दिसून येते. ‘चमकोगिरीत’ ‘अच्छे दिन च्या भुलभुलैय्यामध्ये हे कलाकार फसत नसल्याने भाजपचा जळफळाट होत असल्याची टीका प्रविण दरेकर यांनी केली आहे. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनीही प्रविण दरेकरांवर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा