Pravin Darekar | “आदित्य ठाकरेंचं वय किती? त्या शेंबड्या पोरांनं…”; प्रवीण दरेकरांचा आदित्य ठाकरेंना खोचक टोला
Pravin Darekar | सातारा: पहिल्या पावसामुळे मुंबई शहरात जागोजागी पाणी साचलं होतं. या मुद्द्यावरून आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना सुनावलं होतं. याच पार्श्वभूमीवर प्रवीण दरेकर यांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीकास्त्र चालवलं आहे. जे उद्धव ठाकरेंना जमलं नाही ते शिंदे-फडणवीस सरकारनं 10 महिन्यात करून दाखवलं आहे, असं प्रवीण दरेकर म्हणाले.
How old is Aditya Thackeray? – Pravin Darekar
आदित्य ठाकरे यांना प्रत्युत्तर देत प्रवीण दरेकर (Pravin Darekar) म्हणाले, “वेताळ वक्तव्य करून प्रसिद्धीत राहायचं. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लाज आदित्य ठाकरे काढणार काय? आदित्य ठाकरे यांचा जीव केवढा? त्यांचं वय किती? एका शेंबड्या पोरांनं मुख्यमंत्र्यांची लाज काढायची, असं महाराष्ट्रात कधीच घडलं नव्हतं.”
पुढे बोलताना ते (Pravin Darekar) म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर लोकांचा विश्वास आहे. उद्धव ठाकरे यांना अडीच वर्षात जे करता आलं नाही ते या सरकारनं 10 महिन्यात करून दाखवलं आहे.”
दरम्यान, प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी आदित्य ठाकरे यांचा शेंबडा पोरगा म्हणून उल्लेख केला आहे. दरेकरांच्या या वक्तव्यानंतर शिंदे गटाने ठाकरे गटात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता झाली आहे. त्याचबरोबर आदित्य ठाकरे दरेकर यांच्या या टीकेला काय प्रत्युत्तर देतील याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- Sharad Pawar | अज्ञान आणि इतिहास माहीत नसल्यानं फडणवीस असं बोलतात – शरद पवार
- Sharad Pawar | अजित पवारांना पक्षप्रमुख बनवण्याचा निर्णय मी एकटा घेऊ शकत नाही – शरद पवार
- Jasprit Bumrah | “जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनाची घाई नको, अन्यथा…”; रवी शास्त्री यांची प्रतिक्रिया
- PM Kisan Yojana | ‘या’ तारखेला मिळणार शेतकऱ्यांना प्रत्येकी 4000 रुपये
- IND vs WI | उमरान मलिकला पुन्हा मिळाली टीम इंडियात जागा! वेस्ट इंडीज विरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर
Original NEWS SOURCE – https://bit.ly/3JAVFjp
Comments are closed.