Pravin Darekar | “तुम्ही भाजपमध्ये राहून विरोधकांसाठी काम करता, असं फडणवीस नेहमी म्हणतात”
मुंबई : आपल्याला माहित आहे की, राज्यातील राजकीय वातावरण सध्या खूप गढूळ झालं आहे. त्यात दिवाळी असल्यामुळे ज्याप्रकारे दिवाळीमध्ये फटाके फोडले जातात. त्याचप्रकारे सत्ताधारी आणि विरोधी पक्षनेते एकमेकांवर फटाकेबाजी करत आहेत. अशातच भाजप (BJP) पक्षाचे नेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी एक विधान केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळच उडाली आहे.
काय म्हणाले प्रविण दरेकर (Pravin Darekar)
दिवाळी असल्यामुळे सगळीकडे दिवाळी (Diwali) पहाटचे कार्यक्रम आयोजित केलेले दिसून येत आहेत. या कार्यक्रमांमुळे सर्वजण एकत्र येतात, एकमेकांच्या गाठी-भेटी होतात. त्यामुळे दिवाळी पहाटचा कार्यक्रम केला जातो. तसेच राज्यातील राजकीय नेतेही दिवाळी कार्यक्रमांना आपली उपस्थिती लावत आहेत. अशातच भाजप नेते प्रविण दरेकर यांनीही ‘प्रभाती सूर नभी रंगती’ या दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, “तुम्ही भाजप पक्षात राहून विरोधकांसाठी विरोधी पक्षनेते म्हणून काम करता, असं मला देवेंद्र फडणवीस म्हणतात.”
प्रविण दरेकर यांच्या या विधानामुळे राज्यात अनेक चर्चांणा उधाण आलं आहे. तसेच, ‘प्रभाती सूर नभी रंगती’ या कार्यक्रमात बोलताना अभिनेते मनोज जोशी यांनी दरेकर यांचा उल्लेख विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते असा केला. त्यावर दरेकर म्हणाले, “मी विरोधी पक्षनेता असताना केलेलं कार्य, दौरे आजही लोकांना आठवतात. त्यामुळेच मनोज जोशी यांनी विरोधी पक्षनेते असा माझा उल्लेख केला आहे.”
दरम्यान, ‘प्रभाती सूर नभी रंगती’ या दिवाळी पहाट कार्यक्रमाला खासदार गोपाळ शेट्टी, आमदार प्रवीण दरेकर, आमदार मनीषा चौधरी, अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे, मनोज जोशी, स्वप्नील जोशी, प्रसाद ओक, अभिनेत्री हेमांगी कवी, श्रेया बुगडे, स्वाती देवल यांच्यासह अनेक मराठी कलाकार उपस्थित असल्याचं समजतं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Urfi Javed | टॉपलेस आवतारामध्ये उर्फी जावेद ने दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा
- Ketaki Chitale | “प्रत्येक सणापुढे हॅप्पी लिहून धर्माची माती करु नका”
- BJP | “घरात करमत नाही म्हणून ते शेतकऱ्यांच्या बांधावर येतात”; ‘या’ माजी मंत्र्याची उद्धव ठाकरेंवर टीका
- Uddhav Thackeray | “सत्ताधारांची दिवाळी, सामान्य जनतेचं काय?”, उद्धव ठाकरेंचा सवाल
- Aurangabad | एकीकडे उद्धव ठाकरेंचा दौरा अन् विरोधकांची टीका तर औरंगाबादमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.