मनसेच्या दहीहंडीला नाचणार प्रविण तरडे

मुंबई : गेल्या वर्षी कोरोनाचा वाढत्या संक्रमणामुळे दहीहंडीच्या उत्साहावर पाणी फेरलं होतं. परंतु यावेळी मात्र संपूर्ण महाराष्ट्रात गोविंदा रे गोपाला हा आवाज गरजणार अशी घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केली आहे. मनसेने विश्वविक्रमी दहीहंडी स्पर्धा आयोजित केली आहे. अन् या सोहळ्यात येऊन मी नाचणार अशी घोषणा प्रसिद्ध मराठी अभिनेता प्रविण तरडे याने केली आहे.

मनसे नेते अभिजित पानसे यांनी फेसबुक पोस्टद्वारे दहीहंडीबाबत मोठी घोषणा केली. “विश्वविक्रमी दहीहंडी 31 ऑगस्टला होणार”, असं म्हटलं आहे. यावर आता प्रविण तरडेने “100 टक्के नाचायला येणार” अशी कमेंट केली आहे. ही कमेंट पाहताच त्याच्या चाहत्यांना आनंद झाला आहे.

कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे प्रशासन वारंवार सोशल डिस्टन्सिंग आणि इतर सर्व निर्बंधांचं पालन करण्यास सांगत आहे. या पार्श्वभूमीवर दहीहंडी कशी साजरी केली जाणार याबाबत सर्वांच्याच मनात शंका आहे.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा