Pre Wedding Photoshoot | प्री वेडिंग शूटला बंदी, लग्नाअगोदर वधू-वरांना फिरायला जाण्यास मनाई; ‘या’ समाजाचा धाडसी निर्णय

Pre Wedding Photoshoot | टीम महाराष्ट्र देशा: आजकाल प्री-वेडिंग फोटोशूटचा ट्रेंड लोकप्रिय होत चालला आहे. मात्र, प्री-वेडिंग फोटोशूटमुळे लग्नात फालतू खर्च वाढत जातो. या खर्चावर आळा घालण्यासाठी सिरवी समाजाने पुढाकार घेतला आहे. सिरवी समाजाने प्री-वेडिंग शूट बंद करण्यासोबतच लग्न आधी मुला-मुलीला सोबत बाहेर जाण्यास बंदी घातली आहे.

Pre wedding shoot has been banned by Sirvi society

प्री-वेडिंग फोटोशूट (Pre Wedding Photoshoot) हे भारतीय संस्कृतीच्या विरोधात असल्याचं सिरवी समाजानं म्हटलं आहे. त्यामुळे सिरवी समाज परगाना समितीने प्री-वेडिंग फोटोशूटला आळा घातला आहे. सोनई मांझी गावात ही बैठक पार पडली. या बैठकीत विवाह सोहळ्यात होणारा फालतू खर्च कमी करण्यासाठी डीजे आणि हळद समारंभारावर देखील बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर वर मुलाने क्लीनशेव्ह करून लग्न मंडपात यावे, असा नियम जारी करण्यात आला आहे.

सोनई मांझी येथील सिरवी समाज परगाना समितीच्या बैठकीमध्ये समाज बांधवांनी एकमताने हे (Pre Wedding Photoshoot) निर्णय घेतले आहे. गुरु पौर्णिमेनंतर या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.

सोनई मांझी येथील कुकाराम कुटुंबीयांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक (Pre Wedding Photoshoot) पार पडली. या बैठकीमध्ये माध्यम प्रभारी जगदीश भयाळ, मोहनलाल सोळंकी, मानाराम काग, गंगाराम काग, घिसराम आणि मोहनलाल भयाळ उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/45wBA7e

You might also like

Comments are closed.