Pre-wedding Photoshoot | प्री-वेडिंग फोटोशूटला बंदी घालता येते का? कायदेतज्ञ म्हणतात…

Pre-wedding Photoshoot | टीम महाराष्ट्र देशा: आजकाल प्री-वेडिंग फोटोशूटचा ट्रेंड दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मात्र, विविध समाजांकडूनकडून प्री-वेडिंग फोटोशूटवर बंदी घालण्यात येत आहे. लग्नाआधी केल्या जाणाऱ्या फोटोशूटला अनेक समाज विरोध करत आहे. मात्र, कायद्यानुसार प्री-वेडिंग फोटोशूटवर बंदी घालता येते का? या प्रश्नावर वकील असीम सरोदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सध्या लग्नाच्या आधी प्री-वेडिंग फोटोशूट (Pre-wedding Photoshoot) करण्याचा ट्रेंड वाढत चालला आहे. तरुण-तरुणी प्री-वेडिंग फोटोशूट करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जात असताना. त्याचबरोबर हे फोटोशूट करताना तरुण-तरुणी पश्चिमात्य पद्धतीचे कपडे परिधान करतात. त्यामुळे या फोटोशूटवर बंदी घालण्याचा निर्णय अनेक समाज संस्थांनी घेतला आहे.

Can pre-wedding photoshoots be banned?

प्री-वेडिंग फोटोशूट (Pre-wedding Photoshoot) बंद करण्याच्या प्रकरणावर वकील असीम सरोदे (Asim Sarode) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. असीम सरोदे म्हणाले, “प्री-वेडिंग फोटोशूटवर बंदी घालता येणार नाही. कारण ही बंदी कायद्याला धरून नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन काही उपयोग नाही. प्री-वेडिंग फोटोशूट हा प्रत्येक व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे.

दरम्यान, प्री-वेडिंग फोटोशूट (Pre Wedding Photoshoot) हे भारतीय संस्कृतीच्या विरोधात असल्याचं सिरवी समाजानं म्हटलं आहे. त्यामुळे सिरवी समाज परगाना समितीने प्री-वेडिंग फोटोशूटला आळा घातला आहे. सोनई मांझी गावात ही बैठक पार पडली. या बैठकीत विवाह सोहळ्यात होणारा फालतू खर्च कमी करण्यासाठी डीजे आणि हळद समारंभारावर देखील बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर वर मुलाने क्लीनशेव्ह करून लग्न मंडपात यावे, असा नियम जारी करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://maharashtradesha.com/can-pre-wedding-photoshoots-be-banned/?feed_id=40223&_unique_id=6474749e7021c