InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

सट्टेबाज आरोपीला सोडण्यासाठी भाजप आमदार आणि रावसाहेब दानवे यांचा पोलिसांवर दबाव

मुकुंदवाडी पोलिसांनी एका सट्टेबाजाला पकडल्यावर बदनापूरचे भाजप आमदार नारायण कुचे यांनी पोलिस निरीक्षक उद्धव जाधव यांना फोन करून आरोपीला सोडण्यासाठी दबाव आणला. पण, आमदारांच्या दबावाला बळी न पडता त्यांनी थेट स्टेशन डायरीत नोंद घेतली.

एक पोलीस निरीक्षक आपलं ऐकत नाही म्हटल्यावर आमदार कुचे यांचा रागाने तिळपापड झाला. त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना पोलीस निरीक्षक जाधव यांना फोन करायला लावला. त्याच कामासाठी प्रदेशाध्यक्षांचा फोन आल्यावर ‘साहेब आमदारांसारखी तुमची पण स्टेशन डायरीत नोंद घेऊ का’ असे सुनावत कारवाई करावीच लागेल, असे बाणेदारपणे सांगितले.

नेमकं काय घडलं ? की भाजप आमदार आणि रावसाहेब दानवे यांना पोलिसांवर दबाव आणावा लागला

भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यावर ऑनलाइन सट्टा घेणार्‍या संभाजी दत्तात्रय डोंगरे याला मुकुंदवाडी पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून दोन मोबाइल, तीन हजार 600 रुपशे रोकड, असा मुद्देमाल जप्त केला. अधिक चौकशीत त्याने बाबासाहेब खडके याचे नाव सांगितले. त्यानंतर पोलिसांनी खडकेलाही अटक केली. खडके हा भाजप नेत्याच्या स्वीय सहायकाचा नातेवाईक आहे. तसेच, यवतमाळ येथील राणू जैस्वाल याचे नाव समोर आले.

घडलेला प्रकार बदनापूरचे भाजप आमदार नारायण कुचे यांना समजला. त्यांनी पोलिस निरीक्षक उद्धव जाधव यांना फोन करून खडकेला सोडून देण्यासाठी दबाव आणला. पण, नियमानुसार कारवाई करणारच, असे जाधव यांनी सांगितले. तसेच, आरोपीला सोडण्यासाठी आमदार कुचे यांनी दबाव आणल्याची नोंद स्टेशन डायरीत केली.

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीही पोलीस निरीक्षक जाधव यांना फोन लावत दबाव आणला. प्रदेशाध्यक्ष दानवे तावातावाने बोलत असताना ‘साहेब, आमदारांसारखी तुमच्या नावाची पण स्टेशन डायरीत नोंद करू का’ असे सुनावले. त्यानंतर दानवे यांनी फोन कट केला.

दरम्यान, मुकुंदवाडी पोलिसांनी आरोपी संभाजी दत्तात्रय डोंगरे आणि आरोपी बाबासाहेब खडके यांच्यावर अटकेची कारवाई केली आहे.

भाजप आमदार नारायण कुचेंकडून अनेकदा पोलिसांना दमबाजी

आ. नारायण कुचे यांनी या अगोदर ही अशा अनधिकृत कामासाठी पोलिसांवर दबाव आणला आहे. पोलिस निरीक्षक विद्यानंद काळे यांनी तर कुचे यांच्या अशाच दबावाला कंटाळून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. याशिवाय जिन्सी पोलिस ठाण्यातही एका गुन्ह्यात तत्कालीन पोलिस निरीक्षक खुशालचंद बाहेती यांच्यावर कुचे यांनी दबाव टाकला होता.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply