InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

राज ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पर्दाफाश करत आहेत – पृथ्वीराज चव्हाण

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भूमिका स्वागतार्ह आहे, मात्र त्याचे मतात रूपांतर किती होईल, असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. या प्रश्नाचे उत्तर निवडणुकीच्या निकालानंतरच समजेल, असेही ते म्हणाले. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी ते म्हणाले की, राज ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पर्दाफाश करत आहे. पुढच्या निवडणुकीनंतर मोदी पंतप्रधानपदाच्या जवळपास दिसणार नाहीत.  दरम्यान त्यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्याची माहिती दिली. ते म्हणाले की, हा जाहीरनामा काँग्रेसचा नसून पक्षाचा आहे. या जाहीरनाम्यात लोकांनी व्यक्त केलेल्या सूचना, निवेदन, मागण्या यानुसार बनविण्यात आला आहे. आम्ही त्यात दिलेल्या सर्व आश्वासनांची पूर्तता करणार आहोत.जाहीरनामा तयार करतानाच शक्य असेल त्याच मुद्द्यांचा उल्लेख आम्ही केला आहे. महाराष्ट्राचा जाहीरनामा वेगळा करण्यात येणार असून त्यात स्थानिक प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न करू.

Sponsored Ads

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.