Prithviraj Chavan | सोलापूर: 19 मे 2023 रोजी देशात दुसऱ्यांदा नोटबंदी करण्यात आली. 2016 मध्ये पहिल्यांदा नोटबंदी करण्यात आली होती. यामध्ये 1000 आणि 500 च्या नोटा बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर तीन दिवसांपूर्वी 2000 रुपयांची नोट चलनातून काढून टाकण्यात आली. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.
पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) म्हणाले, “देशातील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी नोटबंदी करण्यात आली होती. मात्र त्यामुळे देशातील भ्रष्टाचार आणखी वाढला आहे. मोदी कॅशलेस सोसायटी आणण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, या जगात एकाही देशामध्ये कॅशलेस अर्थव्यवस्था झालेली नाही. रोकड संपवून टाकायची हे मोदींनी पाहिलेले दिवास्वप्न आहे.”
पुढे बोलताना ते (Prithviraj Chavan) म्हणाले, “दोन हजार रुपयांची नोट फक्त काळा पैसा साठवून ठेवण्यासाठी बाजारात आणली होती. भाजप नेत्यांनी त्याचा पुरेपूर वापर केला आहे. आता पुढच्या निवडणुकीच्या आधी त्या काढून टाकायच्या आहे. मात्र, या नोटबंदीचा आमच्यावर काहीच परिणाम होणार नाही.”
दरम्यान, नोटबंदी प्रकरणावरून सामना अग्रलेखाच्या (Samana Editorial) माध्यमातून मोदी सरकारवर टीकास्त्र चालवण्यात आलं आहे. “मोदी सरकार भारतीय अर्थव्यवस्थेचा खेळखंडोबा करत आहे. पहिल्या नोटबंदीचा खटका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः वृत्तवाहिन्यांवर येऊन दिला होता. पाचशे आणि एक हजाराच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर हाहाकार उडाला होता. नोटबंदीच्या निर्णयानंतर काळा पैसा जास्तच वाढला आहे. नोटबंदीमुळे दहशतवाद्यांना होणारा अर्थ पुरवठा थांबेल, असा दावा मोदी सरकारने केला होता. मात्र, प्रत्यक्षात उलटेच झाले आहे.”
महत्वाच्या बातम्या
- Nitesh Rane | “पाकिस्तानच्या प्रेमात असलेले संजय राऊत…”; राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर नितेश राणे यांची प्रतिक्रिया
- Rohit Pawar | “हा प्रयत्न सरकारला कदापि शोभणारा…”; जयंत पाटीलांच्या ईडी चौकशीवर रोहित पवारांची प्रतिक्रिया
- Sameer Wankhede | उच्च न्यायालयाकडून समीर वानखेडेंना दिलासा! ‘या’ तारखेपर्यंत अटकेपासून संरक्षण
- Nitesh Rane | आदित्य उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचं रक्त भगवं आहे का ? – नितेश राणे
- WTC Final | WTC फायनलमध्ये टीम इंडिया उतरणार नव्या जर्सीत, जय शहांनी केली घोषणा
Original NEWS SOURCE – https://bit.ly/3omSvsi