Prithviraj Chavan | राष्ट्रवादीची भाजप सोबत बोलणी सुरु आहे – पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan | कर्नाटक: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेनंतर राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते भावूक झाले आहे. पवारांनी आपला हा निर्णय मागे घ्यावा अशी विनंती देखील पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे. अशात पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

कर्नाटकमध्ये झालेल्या सभेमध्ये बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले,”राष्ट्रवादी आमच्यासोबत किती दिवस राहणार, हे माहीत नाही. कारण राष्ट्रवादीची भाजपसोबत बोलणी सुरू आहे. राष्ट्रवादीने कर्नाटकमध्ये काँग्रेस विरोधात उमेदवार दिले आहे.”

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवीन अध्यक्षाची निवड करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे. यामध्ये जयंत पाटील, सुप्रिया सुळे, अजित पवार, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, के के शर्मा, पी सी चाको, दिलीप वळसे-पाटील, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख, धनंजय मुंडे, जयदेव गायकवाड, हसन मुश्रीफ, धीरज शर्मा, फौजीया खान यांचा समावेश असू शकतो.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पुढचा अध्यक्ष कोण असेल? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. यामध्ये प्रामुख्याने चार नावं समोर आली आहे. यामध्ये सुप्रिया सुळे, अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि जयंत पाटील या नावांची चर्चा सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.