पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्वशीला चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; पाहा काय आहे प्रकरण…

सातारा : तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. केंद्र सरकारच्या ३ कृषी कायद्याविरोधात शेतकरी २ महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटला तरी दिल्लीत आंदोलन करत आहेत. प्रजासत्ताक दिनाला या आंदोलनाला हिंसक वळण आलेले देखील सगळ्यांनी पाहिले. पण त्यानंतरही शेतकरी बांधव शांतपणे पुन्हा एकदा आंदोलन करत आहेत.

दिल्ली बॉर्डरवर शेतकरी आंदोलन सुरू असून बॉर्डर छावणीत रुपांतरीत करण्यात आले आहे. कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची सरकार चांगलीच कोंडी करत आहे. याचबरोबर देशभर ठीकठीकाणी आंदोलन केली जात आहेत.

याचदरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्वशीला चव्हाण यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करताना पोलिसांनी सत्वशीला चव्हाण यांच्यावर ही कारवाई केल्याची माहिती आहे. यावेळी सत्वशीला चव्हाण यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे.

शेतकऱ्यांसाठी केलेले कायदे हे शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहेत की अदानी अंबानी यांच्या फायद्याचे आहेत?, असा सवाल सत्वशीला चव्हाण यांनी केंद्र सरकारला विचारला आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा