सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो शेअर केल्याने प्रियांका झाली ट्रोल

मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्रानं बॉलिवूडमध्येच नाही तर हॉलिवूडमध्ये सुद्धा आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला आहे. नुकताच प्रियांकाने सोशल मिडियावर तिचा एक ग्लॅमरस फोटो शेअर केला आहे. ज्यामुळे प्रियांका जोरदार ट्रोल केलं जात आहे.

प्रियांकाने हा फोटो शेअर करत लिहिले आहे की, मी आणि निक आता मॅक्स फॅक्टर ब्रँडचे ग्लोबल एंबेस्डर बनलो आहोत. हे सांगत प्रियांकाने व्हाइट ड्रेसमधील एक फोटो शेअर केला. हा फोटो तिच्या चाहत्यांना आवडला आहे. मात्र, हा फोटो सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात ट्रोल देखील केला जात आहे.

एका यूजरने प्रियांकाच्या फोटोवर कमेंट करत म्हटंले आहे की, “लोक मरत आहेत आणि आपल्याला फोटो क्लिक करण्यात मजा येत आहे. मला तुमच्याकडून खरोखरच ही अपेक्षा नव्हती,” असे त्या युजरने म्हंटले आहे.

प्रियंका चोप्रा आणि निक जोनस स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून भारतातील लोकांना मदत करत आहेत. भारताला कशी मदत करता येईल हे त्यांनी लोकांना सांगितले. याबाबत प्रियंकाने सांगितले की, “मी आणि निकने आमच्या वतीने योगदान दिले आहे. प्रत्येकजण सुरक्षित होईपर्यंत कोणीही सुरक्षित नाही. मदतीसाठी अनेक लोक पुढे येत आहेत हे पाहून बरे वाटले.”

महत्वाच्या बातम्या 

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा