InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

काँग्रेसमध्ये गुंडांना प्राधान्य दिले जात आहे; प्रियंका चतुर्वेदींचा काँग्रेसला घरचा आहेर

उत्तर प्रदेशातील काही नेत्यांना पुन्हा पक्षात स्थान दिल्यामुळे काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी नाराज झाल्या आहेत. त्यांनी एक संदेश टि्वट करुन पक्षाला घरचा आहेर दिला आहे. काही महिन्यांपूर्वी मथुरेमध्ये प्रियंका चतुर्वेदींबरोबर गैरवर्तन केल्यामुळे उत्तर प्रदेशातील या काँग्रेस नेत्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली होती. पण आता त्यांना पुन्हा सामावून घेण्यात आले आहे.

त्यावर प्रियंका चतुर्वेदी यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. मी पक्षासाठी दगड खाल्ले, अपशब्द ऐकले पण पक्षामध्येच ज्यांनी मला धमकावले. त्यांच्यावर कुठलीही कारवाई होणार नाही हे दुर्देव आहे असे प्रियंका चतुर्वेदी यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे. त्यांनी एक टि्वट रिटि्वट करुन हा संदेश लिहिला आहे. ज्यांनी पक्षासाठी रक्त आटवले, घाम गाळला त्यांच्याऐवजी काँग्रेसमध्ये गुंडांना प्राधान्य दिले जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.