प्रियंका चोप्राला शूटिंगदरम्यान झाली दुखापत; जखमी फोटो पाहून चाहते हैराण

मुंबई : बॉलीवूडसोबतच हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाने वेड लावणारी ‘देसी गर्ल’ अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या ‘सिटाडेल’ या तिच्या आगामी सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमाच्या शूटिंगवेळी प्रियांकाला दुखापती झाली आहे. प्रियांकाने फोटो शेअर करत ही माहिती आता चाहत्यांनी दिली.

प्रियांकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर इन्स्टास्टोरीला दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये प्रियांकाच्या कपाळावर जखमा झाल्या असून तिचं कपाळ रक्ताने माखलेलं दिसतंय. पहिला फोटो शेअर करत “काय खरं आणि काय खोटं” असं कॅप्शन तिने दिलंय. तर दुसऱ्या फोटोत प्रियांकाने भुवयांमध्ये झालेली जखम खरी असल्याचं म्हंटलंय. तर कपाळावरी जखम ही खोटी असल्याचं सांगितलंय.

प्रियांका चोप्रा लंडनमध्ये ‘सिटाडेल’ या सिनेमाचं शूटिंग करतेय. या सिनेमात प्रियांका एका गुप्तहेराची भूमिका साकारतेय. या सिनेमात ती रिचर्ड मॅडन आणि पेड्रो लिएंड्रोसोबत झळकणार आहे. या सिनेमापूर्वीच प्रियांकाने ‘टेक्स्ट फॉर यू’ सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं असून लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा