प्रियांका चोप्राने सोशल मीडिया हॅण्डलवरुन ‘या’ कारणामुळे काढले जोनस आडनाव?

अमेरिका : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने अमेरिकन गायक निक जोनसशी लग्न केले आहे. या दोघांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. प्रियांकाने लग्न केल्यानंतर तिच्या सोशल मीडिया हॅण्डलवरुन निक जोनसचे आडनाव लावले होते. आता प्रियांकाने तिच्या सोशल मीडिया हॅण्डलवरुन जोनस हे तिचे सासरचे आडनाव अचानक वगळले आहे.

दरम्यान, काही नेटकऱ्यांनी या दोघांचा घटस्फोट होणार असल्याचे म्हटले तर काही नेटकऱ्यांनी त्याच कारण दुसरं असल्याचं म्हटलं आहे. असे म्हटले जाते की निकला त्याचा आगामी कॉमेडी शो ‘जोनस ब्रदर्स फॅमिली रोस्ट’च्या प्रमोशनसाठी प्रियांकाने हे केलं आहे. ‘जोनस ब्रदर्स फॅमिली रोस्ट’ हा शो आज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या शोमध्ये जोनस ब्रदर्स आणि त्यांच्या पत्नी एकमेकांना ट्रोल करताना दिसणार आहेत.

तसेच, प्रियांकाचा लवकरच ‘मॅट्रिक्स ४’ हा चित्रपट येणार आहे. प्रियांकाने काल तिच्या सोशल मीडिया हॅण्डलवरुन निक जोनसचे आडनाव काढले आणि त्यानंतर आज तिने ‘मॅट्रिक्स ४’च पोस्टर शेअर केलं आहे. आता या दोघांनी पैकी कारण असेल अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा