InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

….आणि काँग्रेस नेता म्हणाला प्रियांका चोप्रा झिंदाबाद!

- Advertisement -

दिल्लीत सध्या आगामी विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्तानं काँग्रेस मतदारांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे. दिल्ली काँग्रेसची जबाबदारी सध्या सुभाष चोप्रा यांच्याकडे आहे. सुभाष चोप्रा यांच्या उपस्थितीतच एका जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी एका उत्साही कार्यकर्त्यानं पक्षातील वरिष्ठ नेत्यांची नावं घेतली. त्याला उपस्थितांमधूनही जिंदाबाद प्रतिसादही मिळत होता.

काँग्रेस पार्टी जिंदाबाद, सोनिया गांधी जिंदाबाद, राहुल गांधी जिंदाबाद, अशी घोषणाबाजी सुरू होती. त्यातच पठ्यानं प्रियंका गांधी यांच्याऐवजी प्रियंका चोप्रा असं नाव घेतलं. काहींनी त्याला प्रतिसाद देत जिंदाबादही म्हटलं. पण, या मुळं व्यासपीठावर एकच खळबळ उडाली. ज्येष्ठ नेत्यांना हा प्रकार लक्षात आला. पण, तोपर्यंत वेळ निघून गेली होती. व्यासपीठावर उपस्थित माजी आमदार सुरेंद्र कुमार यांनी संबंधित कार्यकर्त्याला प्रियंका गांधी म्हण, असं हळूच सांगितल्यानंतर त्यानं पुन्हा प्रियंका गांधी जिंदाबाद, अशी घोषणा केली.  सध्या ट्विटरवर हा व्हिडिओ प्रचंड शेअर केला जात आहे.

Loading...

- Advertisement -

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.