InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

‘प्रियंका गांधी या इंदिरा गांधींचे हुबेहूब रूप’

प्रियंका गांधी या इंदिरा गांधींचे हुबेहूब रूप आहेत व त्यांच्या वागण्या–बोलण्यात ती झलक दिसते. त्यामुळे हिंदी भाषिक पट्टय़ात काँगेसला नक्कीच उभारी येईल. प्रियंकाची तोफ धडाडली व तिच्या सभांना गर्दी झाली तर ही बाई इंदिरा गांधींप्रमाणे हुकमाची राणी ठरू शकेल.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखात प्रियंका गांधी यांच्या सक्रिय राजकारणात उतरण्याच्या निर्णयाचे समर्थन करताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. ‘राफेल’सारख्या विषयावर त्यांनी सरकारला कोंडीत पकडले आहे. हे एकवेळ सोडा, पण तीन महत्त्वाच्या राज्यांत काँग्रेसने भाजपकडून सत्ता खेचून घेतली व त्यामुळे मृतवत काँग्रेसला संजीवनी मिळाली. त्याचे श्रेय त्यांना न देणे हे कोत्या वृत्तीचे लक्षण आहे. राहुल गांधींनी उत्तम डाव टाकला आहे अशा शब्दात सामनाच्या अग्रलेखात राहुल गांधींचे कौतुक करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या –

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.