InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

‘प्रियांका गांधी या फक्त दिसायला सुंदर आहेत, त्यांच्याकडे राजकीय कर्तृत्व नाही’

प्रियांका गांधी या फक्त दिसायला सुंदर आहेत. पण त्याआधारे मत मिळत नाही. त्यांच्याकडे राजकीय कर्तृत्व नाही, असे वादग्रस्त विधान बिहारमधील मंत्री आणि भाजपा नेते विनोद नारायण झा यांनी केले प्रियांका गांधी यांच्या सक्रीय राजकारणातील प्रवेशासंदर्भात त्यांनी हे विधान केले आहे.

प्रियांका गांधी यांच्या सक्रीय राजकारणातील प्रवेशासंदर्भात विनोद नारायण झा यांनी एएनआयला प्रतिक्रिया दिली. प्रियंका गांधी या दिसायला सुंदर आहेत. पण त्या आधारे मत मिळत नाही. त्या रॉबर्ट वढेरा यांच्या पत्नी असून रॉबर्ट वढेरा यांचा भूखंड घोटाळ्यात समावेश आहे. प्रियंका या फक्त दिसायला सुंदर आहेत, पण त्यांच्याकडे राजकीय कर्तुत्व काहीच नाही, असे झा यांनी सांगितले. झा यांच्या विधानावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या –

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.