प्रियंका गांधी उत्तरप्रदेशमध्ये ‘या’ मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता!

लखनऊ : उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीत भाजपशी थेट मुकाबला करण्यासाठी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसची जोरदार तयारी सुरु आहे. त्यांच्या राजकीय सल्लागार समितीच्या एका सदस्याने लोकमतशी बोलताना हे संकेत दिले. तर उत्तर प्रदेश निवडणुकीत सत्तधारी भाजप विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवणार हे स्पष्ट झालं आहे.

उत्तर प्रदेशची निवडणूक देशाच्या येणाऱ्या 2024 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर महत्वाची ठरणार आहे. परिणामी उत्तर प्रदेश निवडणुकीवर सत्ताधारी आणि विरोधक यांचं लक्ष लागलं आहे. सपा, बसपा, आप, यांनी आपली तयारी चालू केली आहे. तर कॅंग्रेस पक्ष प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवणार आहे. प्रियंका गांधी या अमेठी किंवा रायबरेली यापैकी एका मतदारसंघातून 2024 लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

रणनीतीकार प्रशांत किशोर यांनीही प्रियांका गांधी यांना अमेठी किंवा रायबरेलीतून लढण्याचा सल्ला दिला होता. प्रियांका गांधी यांचा अलीकडचा दौरा, बैठका या दृष्टीने महत्त्वाचा ठरतो. माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांनी तर सांगितले आहे की, प्रियांका गांधी काँग्रेसचा चेहरा असतील. प्रियंका गांधी यांनी आतापासूनच उत्तर प्रदेशवर आपलं लक्ष द्यायला सुरूवात केली आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा