अर्थव्यवस्थेतील मरगळीवरुन प्रियांका गांधींचा सरकारवर निशाणा

काँगेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी अर्थव्यवस्थेतील मरगळीवरुन सरकारवर निशाणा साधला आहे. देशात मोठी मंदी आहे, पण अर्थमंत्री आणि सरकारमधील लोकांनी मौन साधणंच पसंत केल्याची टीका त्यांनी केली आहे. देशातील सामान्य नागरिक भाजप सरकारच्या आघाडीच्या नेत्यांकडून, अर्थ मंत्र्यांकडून या मंदीवर काही ऐकू इच्छितात, असे टि्वट त्यांनी केले आहे.

तत्पूर्वी, प्रियांका गांधी यांनी पहलू खान हत्येप्रकरणातील सर्व आरोपींना निर्दोष सोडण्याचा न्यायालयाच्या निर्णयावर ‘धक्कादायक’ असल्याचे म्हटले होते. पहलू खान हत्या प्रकरणात खालच्या न्यायालयाने दिलेला निकाल धक्कादायक आहे. आपल्या देशात अमानवीयतेला कसलाही थारा नसला पाहिजे. जमावाद्वारे हत्या एक मोठा अपराध आहे, असे टि्वट त्यांनी केले होते.

कारखाने बंद होत आहेत, नोकऱ्या संपुष्टात येत आहे. पण सरकारमधील लोक गप्प बसले आहेत, का ?, असा सवाल करत त्यांनी एक बातमीही या टि्वटसोबत जोडली आहे. या वृत्तानुसार वाहनांच्या विक्रीत मागील १९ वर्षांतील नीचांक नोंदवण्यात आला आहे. ऑटो क्षेत्रात १० लाखांहून अधिक लोकांना आपली नोकरी गमवावी लागण्याची शक्यता आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या –

दुरदर्शनच्या निवेदिका नीलम शर्मा यांचे शनिवारी प्रदीर्घ आजाराने निधन

केरळमध्ये पावसाचा प्रकोप, महापुरामुळे ११३ जणांचा मृत्यू

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने पूरग्रस्तांसाठी मदत

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.