प्रियांका गांधींविरुद्ध अश्लिल टिप्पणी; त्या ‘मोदी समर्थकाला’ अटक

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्या फोटोशी छेडछाड करुन, सोशल मीडियावर अश्लिल टिप्पणी करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केलीय. नुकतंच, राजकारणात सक्रीय झालेल्या सोनिया गांधी यांची मुलगी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची बहिण प्रियांका गांधी यांच्याविरुद्ध सोशल मीडियावर अनेक आक्षेपार्ह ट्विट दिसत होते. याविरुद्ध काँग्रेसनं सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.

बिहारच्या कटिहार भागातून योगी सूरजनाथ नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केलीय. हा व्यक्ती स्वत:ला ट्विटर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भक्त म्हणवून घेतोय. परंतु, योगी सूरजनाथच्या अटकेनंतर मात्र बिहार भाजप अध्यक्ष मनोर राय यांनी मात्र त्याचा पक्षासोबत कोणताही संबंध नसल्याचं सांगितलंय.

योगी सूरजनाथ हा बिहारच्या कटिहार जिल्ह्यातील बिनोदपूर परिसरातील रहिवासी आहे. तो ट्विटरवरील ‘मिशन भाजप 2019’ चा उत्साही फॉलोअर आहे. मात्र या व्यक्तीशी आपला काहीही संबंध नाही, असं भाजप जिल्हा प्रमुख मनोज राय यांनी सांगितलं. योगी सूरजनाथने 30 जानेवारीला केलेल्या ट्विटबाबत तक्रार मिळाली होती, असं पोलिसांनी सांगितलं. सामाजिक कार्यकर्ते शाहीन सैय्यदने याबाबत तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी सूरजनाथला कटिहारमधून शोधून काढलं. त्याच्यावर गुन्हा दाखल करुन, त्याला कोर्टात हजर केलं असता, त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली.

Loading...
महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.