InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

न डगमगता स्ट्राँगरुम आणि मतमोजणी केंद्रांवर खंबीरपणे उभे राहा- प्रियंका गांधी

विविध वृत्तवाहिन्यांनी घेतलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपाप्रणित एनडीएला बहुमत मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या एक्झिट पोलचे आकडे समोर आल्यानंतर काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी कार्यकर्त्यांना स्ट्राँगरुमबाहेर खंबीर उभे राहण्याचे आवाहन केले आहे.

एक्झिट पोलचे आकडे समोर आल्यानंतर पहिल्यांदाच काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. कार्यकर्त्यांनी अफवा आणि एक्झिट पोलवरुन घाबरुन जाण्याचे काही कारण नाही, असे प्रियंका गांधी यांनी एका ऑडिओमार्फत जारी करण्यात आलेल्या संदेशात म्हटले आहे. तसेच, अशा अफवा कार्यकर्त्यांचे मनोबल खच्चीकरण करण्यासाठी पसरवल्या जात आहेत, म्हणून यासंबंधी सावधानता अधिक महत्वपूर्ण ठरते. त्यामुळे न डगमगता स्ट्राँगरुम आणि मतमोजणी केंद्रांवर खंबीरपणे उभे राहा, असेही प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply