प्रियांकाचा पती निक जोनस बॉलिवूडमध्ये करणार एण्ट्री?

मुंबई : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनस यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. दरम्यान प्रियांका तिची जादू हॉलिवूडमध्ये पसरवत असताना आता निक बॉलिवूडमध्ये एण्ट्री करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत निक बॉलिवूड विषयी म्हणाला, “माझं लग्न प्रियांकासोबत झाल्यापासून मी बरेच भारतीय चित्रपट पाहिले आहेत. गाणी ऐकली आहेत. हे चित्रपट प्रेरणा देणारे असतात. मी भारतातच लग्न केलं. त्यानंतर ज्या-ज्या कार्यक्रमांच्या निमित्ताने भारतात गेलो तेव्हा अनेक बॉलिवूडमधल्या लोकांना भेटलो. त्यांच्याशी मी खूप गप्पा मारल्या आहेत. ते सगळेच प्रोत्साहित करत होते.” असे निक म्हणाला.

पुढे निक म्हणाला, “आमच्या घरी पार्टी असली की आम्ही बॉलिवूडची गाणी लावतो. आमच्या घरी येणारे पाहूणे हे फक्त भारतीय नसतात तर अमेरिकेचेही असतात पण त्यांना देखील ही गाणी आवडतात. भारतीय चित्रपटांसाठी आणि तिथल्या गाण्यांसाठी माझ्याकडे एकच शब्द आहे तो म्हणजे ‘अभुतपूर्व’. मला अशा अप्रतिम चित्रपटसृष्टीत काम करायला नक्कीच आवडेल. मला जर चांगली ऑफर मिळाली तर मी नक्कीच काम करेन.”

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा