“विखे पाटील हे रंग बदलणारे सरडे”

निळवंडे धरणाचे पाणी रोखणाऱ्या विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात संगमनेरणध्ये थोरात गटाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आंदोलन केले.  यावेळी कॉंग्रेस आंदोलकांनी राधाकृष्ण विखे व त्याचे चिरंजीव सुजय विखे यांच्यावर सडकून टीका करताना राधाकृष्ण विखे हे रंग “बदलणारे सरडे’ पाटील तर त्यांचे चिरंजीव सुजय हा “मटन दादा’ आहे, असा जोरदार प्रहार केला. 

निळवंडे धरणातून सोडण्यात येणारे पाण्याचे आवर्तन संगमनेरपर्यत सोडण्याच्या मागणीसाठी रविवारी संगमनेरमध्ये कॉंग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यासह कार्यकर्त्यांनी पुणे – नाशिक रस्त्यावर आंदोलन केले. पोलिसांनी आंदोलन रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलक थांबले नाहीत. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. पोलिसांनी 28 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

ओझर पर्यंत पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नावाने दिल्यानंतर संगमनेरला पाणी मिळण्याचे निश्‍चित झाले.

Loading...

महत्त्वाच्या बातम्या – 

 

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.