अभिमानास्पद ! पुण्यातील आर्मी स्टेडियमचे नाव आता ‘नीरज चोप्रा स्टेडियम’

पुणे : भारताचा स्टार खेळाडू नीरज चोप्रा याच्या खेळीकडं भारताच्या नजरा लागल्या होत्या. मात्र यानंतर त्याने टोकियो ऑलंम्पिकमध्ये भालाफेक या प्रकारात सुवर्णपदक मिळवून दिल. यानंतर आता यावर एक मोठा निर्णय घेण्याची शक्यता होती. तर पुण्यातील आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटच्या मैदानाला टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेकीत सुवर्ण पदक मिळवलेल्या नीरज चोप्राचं नाव दिले गेलय.

तसेच यावेळी १६ ऑलिम्पिक खेळाडूंचा सत्कार देखील केला जाणार आहे. सोमवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह पुण्याच्या दौऱ्यावर येणार आहे. यावेळी आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटला भेट देणार असून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी या मैदानाला ‘नीरज चोप्रा आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट’ असं नाव देण्याची शक्यता आहे.

यामुळे पुणेकरांमध्ये उत्साहाचे वातावरण आज पाहायला मिळाले. यावेळी नाईक सुभेदार दीपक पुनिया यांचा विशेष मेडल देऊन सिंह यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसंच नाईक अर्जुनलाल जाट, नाईक सुभेदार विष्णू सर्वनंद, महाराष्ट्रातील नाईक सुभेदार अविनाश सावळे यांनाही यावेळी सन्मान केला गेला. त्यावेळी आर्मीतील ऑलिम्पिक खेळाडूंची शॉल देऊन नीरज चोप्राने राजनाथ सिंह यांचं स्वागत केले.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा