InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

तृणमूलवर केलेले आरोप सिद्ध करा, अन्यथा तुरुंगात पाठवेन – ममता बॅनर्जी

भाजप आणि तृणमूल काँग्रेसमधील वाद टोकाला गेला आहे. तृणमूलवर केलेले आरोप सिद्ध करा, अन्यथा तुरुंगात पाठवेन, असा इशारा तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शहांना दिला. निवडणूक आयोग भाजपाचा भाऊ आहे. आधी आयोग निष्पक्ष होता. मात्र आता निवडणूक आयोग विकला गेला आहे, असं प्रत्येक जण म्हणतो,’ अशा शब्दांत त्यांनी निवडणूक आयोग आणि भाजपवर टीकेची झोड उठवली. तृणमूलवर खोटे आरोप करताना लाज वाटत नाही का, असा सवाल देखील ममता यांनी विचारला.

शहांनी तृणमूलवर केलेले आरोप या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी बोलत होत्या. शहांचे आरोप पूर्णपणे चुकीचे आहेत, असा दावा त्यांनी केला. यावेळी त्यांनी भाजप आणि निवडणूक आयोगाला लक्ष्य केलं. ‘भाजपानं निवडणूक आयोगाकडे आमची तक्रार केल्याचं काल रात्री समजलं. पंतप्रधान मोदींच्या सभेनंतर आमची सभा होऊ नये, यासाठी भाजपानं निवडणूक आयोगाकडे धाव घेतली असा आरोप देखील ममता यांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply