मराठवाड्यात मानसोपचार रुग्णालय : राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या मागणीला आरोग्यमंत्र्यांची तत्वतः मंजुरी

मराठवाडा विभागात मनोरुग्णांवर उपचार करण्याची सोय नसल्याने या भागात मनोरुग्णालय व्हावे या पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्य व्यवसाय राज्यमंत्री तथा उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी केलेल्या मागणीला आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्वतः मान्यता दिली आहे. जालना जिल्ह्यातील रामनगर भागात 20 एकर जागेवर हे मनोरुग्णालय उभे राहील यासाठीचा प्रस्ताव तयार करून तो मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेला सादर करण्यात येणार आहे.

जालना तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रलंबित आरोग्य समस्यांबाबत श्री. खोतकर हे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. या अनुषंगाने आज यशवंतराव चव्हाण सभागृहातील कक्षात आरोग्यमंत्र्यांसह याबाबत विस्तृत चर्चा झाली. त्यावेळी इतर अनेक बाबींवर आरोग्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने जालना व उस्मानाबाद जिल्ह्यातील आरोग्यविषयक समस्या दूर होतील असा विश्वास श्री. खोतकर यांनी व्यक्त केला आहे. या बैठकीलाआरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, आयुक्त डॉ. अमित कुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ. सतीश पवार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सध्या अस्तित्वात असलेल्या महिला रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन सध्या असलेली 40 खाटांची क्षमता 100 खाटांपर्यंत वाढविण्यात येणार आहे. त्यासाठीची नवीन इमारत तयार असून यासाठी लागणारा कर्मचारी वर्ग वाढवून देण्यात येईल. तोपर्यंत सध्या एन. एच. आर. एम. मधील कर्मचारी वर्ग वापरण्यात येईल. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयाचे बळकटीकरण करुन तिथे आवश्यक त्या सोयी सुविधा पुरविण्यात येणार आहेत. सध्या असलेली 200 खाटांची संख्या सुरुवातीस 100 खाटांनी वाढवून त्यासाठी आवश्यक तो कर्मचारी वर्ग वाढविण्याच्या मागणीलाही आरोग्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आवश्यक त्या कार्यवाहीला सुरुवात करण्याचे निर्देशही आरोग्यमंत्र्यांनी यंत्रणेला दिले आहेत.

Loading...

भाग्यश्री मोटे झळकणार थेट बॉलिवूडमध्ये!

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.