पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते भित्तीपत्रकांचे प्रकाशन

वाशिम : जिल्ह्यातील नागरिकांना व लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांची माहिती व्हावी, यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाने जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना सन २०१९-२० या वर्षात तयार केलेल्या विविध भित्तीपत्रकांचे प्रकाशन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात केले.

लॉकडाऊनमुळे नोकरी गेली ,पगार कपात झाला असल्यास मनसेशी संपर्क साधा

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती.

राष्ट्रीय कबड्डीपटू अशोक कोंढरेंचे निधन

शासनाच्या अनेक लोककल्याणकारी योजना आहेत. या योजनांची माहिती नागरिकांना तसेच लाभार्थ्यांना झाली तर त्या योजनांचा लाभ घेऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे. अशा काही योजनांची भित्तीपत्रकांच्या माध्यमातून गावोगावी प्रसिद्धी व्हावी यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाने जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना सन २०१९-२० या वर्षात योजनांवर आधारित सचित्र माहिती असलेली भित्तीपत्रके तयार केली आहेत. या भित्तीपत्रकांमध्ये मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, मनोधैर्य योजना, माझी कन्या भाग्यश्री, ग्रामीण व शहरी भागातील युवक मंडळांना आर्थिक साहाय्य, दुधाळ जनावरांचे गट वाटप, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, मच्छिमार सहकारी संस्थांना अर्थसहाय्य आणि मागेल त्याला शेततळे आदी योजनांचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.