InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

पिंपरी ते शिवाजीनगर मार्गावर वर्षअखेर मेट्रो धावणार – गिरीश बापट

पुणे मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांनी वडगावशेरी मतदारसंघातील खराडी आणि धानोरी भागात प्रचारफेरी काढत लोकांच्या भेटी घेतल्या . यावेळी बोलताना बापट यांनी या वर्षअखेर पिंपरी ते शिवाजीनगर मेट्रो सुरू होणार असल्याचे आश्वासन देखील त्यांनी दिले.

बापट म्हणाले की, मेट्रो प्रकल्पाच्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महापालिकाहद्दीतील  कामांनी वेग घेतला आहे. या वर्षाअखेर आम्ही पिंपरी ते शिवाजीनगर मार्गावर मेट्रो सुरू करणार असून, नोव्हेंबर पर्यंत ते काम पुर्ण होणार असल्याचे गिरीश बापट यांनी सांगितले. मागील 15 वर्षांपासून रखडलेला मेट्रो प्रकल्प 5 वर्षात पुर्णत्वास नेला असल्याने अभिमान वाटत असल्याचे देखील बापट यावेळी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply