InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

लग्न ठरत नसल्याने पुण्यातील तरूणाचे थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र

लग्नास वारंवार नकार मिळत असल्याने पुण्यातील दत्तवाडी परिसरात राहणाऱ्या तरुणाने  थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र लिहिले आहे. पत्रामध्ये मुलाने इच्छामरणाची मागणी केली आहे.

पत्र मिळाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ पत्राची दखल घेत पुणे आयुक्तांना याबाबत कळविले. यानंतर स्थानिक दत्तवाडी पोलिसांनी तरूणाशी संपर्क करत त्याचे मन वळवले.

मुलाचे पत्र – 

मी माझ्या नाकर्तेपणामुळे आनंदाने इच्छा मरणाची मागणी करत आहे. मी आनंदाने मृत्यूला सामोरे जाण्यास तयार आहे. मी 37 वर्षाचा अविवाहित तरुण आहे. मी नोकरी करतो आणि माझे उत्पन्न मासिक 25000 रुपये आहे. माझी आई 73 वर्षांची असून वडील 81 वर्षांचे आहेत. माझी घरची परिस्थिती साधारण आहे. मला माझं स्वतःचं आस्तित्व बनवायचं आहे मात्र जगणे मला हे करण्यासाठी अपात्र ठरविले आहे. माझ्यामुळे कुणीही सुखी आणि समाधानी राहू शकत नाही, अगदी माझे आईवडील सुद्धा. आई वडिलांची सेवा करणारी जोडीदार मिळत नाही.

महत्त्वाच्या बातम्या –

Sponsored Ads

Get real time updates directly on you device, subscribe now.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.